42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ चैत्र नवरात्रीनिमित्त ३० मार्च पासून डोंगरगडसाठी विशेष गाड्या

चैत्र नवरात्रीनिमित्त ३० मार्च पासून डोंगरगडसाठी विशेष गाड्या

0
112

blank

गोंदिया : येत्या रविवार ३० मार्च पासून चैत्र नवरात्री ला सुरुवात होणार आहे. छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे चैत्र नवरात्रीला बमलेश्वरी देवी दर्शना करिता छत्तीसगड राज्यसह शेजारील महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी बघता, भाविकांच्या सोयीकरिता बमलेश्वरीधाम डोंगरगड रेल्वे स्थानका साठी रेल्वेने काही विशेष गाड्या धावणार अशी सोय केली आहे. या सोबतच या मार्गावरील सर्व जलद (एक्स्प्रेस) गाड्या ही डोंगरगड येथे थांबतील असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी पत्रका द्वारे जाहीर केले आहे.

चैत्र नवरात्री निमित्त ३० मार्च ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत डोंगरगड येथील माँ बमलेश्वरी मंदिरात जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्यांचा विस्तार आणि काही गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डोंगरगड रेल्वे स्थानकावर ३० मार्च ते ६ एप्रिल २०२५ दरम्यान थांबणाऱ्या गाड्या मध्ये गोंदिया-दुर्ग-गोंदिया मेमू ( रायपूर पर्यंत, रायपूर-डोंगरगड-रायपूर मेमू गोंदिया पर्यंत वाढवण्यात आली आहे. डोंगरगड- दुर्ग-डोंगरगढ मेमू तसेच दुर्ग-रायपूर-दुर्ग मेमू विशेष ट्रेन देखील विशेष गाड्या म्हणून चालवल्या जातील. तात्पुरत्या गाड्यांमध्ये बिलासपूर-भगत की कोठी एक्सप्रेस बिलासपूर-बिकानेर एक्सप्रेस बिलासपूर-चेन्नई एक्सप्रेस बिलासपूर-पुणे एक्सप्रेस आणि पुणे हा बिलासपूर एक्सप्रेस. तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस , इतवारी-कोरबा एक्स्प्रेस , इतवारी-बिलासपूर एक्स्प्रेस मध्येही तात्पुरती कोचची सुविधा दिली जाणार आहे.

blank