# पोवार बोर्डिंग येथील सभेनंतर बँकेवर धडकले मोर्चा
# बँक संचालक यांच्या विरुद्ध तीव्र असंतोष उफाळून निदर्शने
गोंदिया :-विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटना जिल्हा गोंदिया च्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चा आयोजित करण्यात आले होते, जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थाणांच्या संचालक यांचे एकत्रिकरण पोवार बोर्डिंग येथील सभागृह येथे करण्यात आले. यावेळी प्रथम संघटनेच्या वतीने सभा घेऊन आपल्या मागणी संदर्भात भूमिका स्पष्ट केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डोमा बोपचे, प्रा. सुभाष आकरे, पंकज यादव, दिलीप बनसोड धर्मेंद्र पटेल प्यारेलाल गौतम डॉक्टर योगेश हरीणखेडे, पंकज यादव, लखन मेंढे, यशवंत मानकर, खुमेश कटरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सदर मोर्चा पवार बोर्डिंग येथून बँकेच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आले. मोर्चाची सुरुवात पोवार बोर्डिंग ते गुजराती हायस्कूल,पाल चौक मार्गे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे रूपांतर बँकेच्या समोर सभेत झाले त्या ठिकाणी इंजिनियर सुभाषआकरे आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष डोमाजी बोपचे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटनेच्या वतीने मागण्यांच्या संदर्भात समायोजित मार्गदर्शन केले. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन आणि त्यांचे संपूर्ण संचालक मंडळांनी मोर्चाला सामोरे जाऊन मागण्यांचे निवेदन संघटने कडून स्वीकारले. त्यावर बँकेचे अध्यक्ष यांनी मागण्यांच्या संदर्भात बँक स्तरावरील मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले व शासन व्यवस्था असलेल्या मागण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले.मोर्चात विविध कार्यकारी संघटनांचे तालुकाध्यक्ष सचिव उपाध्यक्ष व जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक उपस्थित होते.