34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ स्फोटके निर्मिती कंपनीला आग, मोठी दुर्घटना टळली

स्फोटके निर्मिती कंपनीला आग, मोठी दुर्घटना टळली

0
67

blank

नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील येनवेरा गावातील एसबीएल एनर्जी नावाच्या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला मोठी आग लागली. या आगीत दोन मशीन जळून राख झाल्याची माहिती आहे. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली.

ही आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटके बनविणाऱ्या कंपनीला लाग लागल्याची माहिती मिळताच काटोलचे सहायक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना ताजीच असताना दुसरी घटना घडल्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.काटोल तालुक्यातील येनवेरा गावात एसबीएल एनर्जी प्लांट असून या प्रकल्पाला पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेने व्यावसायिक स्फोटके तयार करण्याचा परवाना दिला आहे. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कंपनी बंद असताना अचानक इमारत क्रमांक पाचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा आवाज काही सुरक्षारक्षकांना आला. त्यांनी लगेच इमारतीकडे धाव घेतली असता तेथे आग लागल्याचे दिसून आले.

इमारतीच्या गोदामात सुमारे एक ते दीड हजार मेट्रिक टन अमोनियम नायट्रेटच्या पिशव्या ठेवलेल्या होत्या. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अमोनियम नायट्रेटच्या साठ्याला आग लागल्याचे बोलले जाते. काही मिनिटातच आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे इमारतीमध्ये असलेल्या मशिनलाही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने एसबीएल कंपनीत पोहचल्या. काटोल पोलीसही तेथे पोहचले. अग्निशमन दलाने तीन तासांपर्यंत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

blank