हेवती ते वेकोली : नवीन वीज वाहिनी कार्यान्वित, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
29

नागपूर, दि. 11 एप्रिल 2025: महावितरणच्या उमरेड विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हेवती ते वेकोली या मार्गावर नवीन 33 केव्ही वीज वाहिनी कार्यान्वित केली आहे. ही वाहिनी बुधवार, दिनांक 9 एप्रिल पासून कार्यान्वित झाली असून या वाहिनीमुळे भागातील वीज पुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

नव्याने कार्यान्वित झालेल्या या वीज वाहिनीमध्ये विद्युत प्रवाह सुरु असल्याची नोंद घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी या वाहिनीखाली तसेच वाहिनीच्या जवळपास कोणत्याही प्रकारचे काम करणे टाळावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. मौजा शेव, आयटीआय कॉलेज जवळील परिसर, बुधवारी रोड, ठोंबरा आणि उदास या गावांना या नवीन वाहिनीमुळे फायदा होणार आहे. या भागातील वीज पुरवठा आता अधिक स्थिर आणि सुरळीत होणार आहे.
महावितरण वेळोवेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना जारी करत असते. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.