गोंदिया : शासन आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत “पासपोर्ट सेवा केंद्र आपल्या दारी” दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी गोंदिया हेड पोस्ट ऑफिस येथे एक दिवसीय पासपोर्ट सेवा मोबाइल कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि चर्चा करत प्रक्रिया जाणून घेतली. या कॅम्पमध्ये नवीन पासपोर्ट तसेच पासपोर्ट नूतनीकरणाचे (रिन्यूअलचे) काम करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहान पंकज रहांगडाले यांनी नागरिकांना केले. उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्यास कॅम्प आठवड्यातून ३ दिवस आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि माजी खासदार सुनील मेंढे यांचे आभार व्यक्त केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद गुड्डू चांदवाणी, पुरू ठाकरे, गोल्डी गावंडे, फणिंद्र पटले, आणि विलाश गौतम उपस्थित होते.