31.8 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ क्रांतीसुर्य महात्मा फुले तथा परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती पर्वावर...

क्रांतीसुर्य महात्मा फुले तथा परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती पर्वावर रुग्णांना फळवाटप करून महामानवांना शिक्षक संघातर्फे अभिवादन

0
71

अर्जुनी मोरगाव (ता. १४ एप्रिल): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अर्जुनी मोरगावच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे रुग्णांना फळवाटप करून या थोर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापुरुषांच्या जयंती पर्वावर संघटनेतर्फे फळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला,या उपक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला. समाजातील उपेक्षित, गरजू व रुग्णांसाठी या महापुरुषांनी केलेले कार्य लक्षात घेता त्यांच्या जयंतीनिमित्त ही सामाजिक सेवा करण्यात आली. रुग्णालय प्रशासनानेही या उपक्रमाचे स्वागत करत शिक्षक संघाचे आभार मानले.
यावेळी संघटनेच्या वतीने प्रामुख्याने अरविंद नाकाडे,गजानन रामटेके, भूवन औरासे, राजेश साखरे, कैलास हांडगे, कीर्तीवर्धन मेश्राम, किशोर लंजे, प्रल्हाद कापगते, सुरेश रामटेके, युवराज खोब्रागडे, अरुण फाये,उमाकांत मेश्राम, अनिल सूर्यवंशी, धनंजय मडावी, अमोल चौरे, गोविंद बगडे,चिंतामण कांबळे, प्रकाश सांगोडे, अजय घरामी,प्रमोद चाचरे, नितीन तिडके यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष कैलास हांडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरचिटणीस किशोर लंजे यांनी मानले.

blank