गोंदिया, दि. ०१ मे २०२५ : जिल्हा परिषदेच्या विविध विकास योजना राबविण्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा प. सा. विभागाचे अभियंता एन. जी. कट्यारमल यांना दिनांक ०१ मे २०२५ रोजी जिल्हा परिषदेत वतीने गौरविण्यात आले.
“जि. प. सा. उपअभियंता गोंदिया” अंतर्गत त्यांनी यशस्वीरित्या “अभिसरण योजना” तसेच “ग्रामीणमातोंश्री पाणी योजना” अमलात केलेल्या उत्कृष्ट कामकाजामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना सर्व सुविधायुक्त महिला बचत भवन व रस्ते सुविधा लाभल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अमलबजावणीमुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास साधता आला.
या उल्लेखनीय योजनांमुळे दक्षल घेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया मुरंगनाथम यांच्या हस्ते, मा. जि. प. अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. कट्यारमल यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुरंगनाथम यांनी अभिनंदन करताना सांगितले की, “अभियंता कट्यारमल यांनी अत्यंत नियोजनबद्ध व कष्टपूर्वक काम करून ग्रामीण भागात विकासाचे नवे मापदंड स्थापित केले आहेत.”
गोंदिया जिल्ह्यातील विविध विकासकामात अधिक वेगाने आणि गुणवत्तापूर्ण रितीने पार पाडण्यासाठी अभियंता कट्यारमल यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. याचे श्रेय त्यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मुरंगनाथम, जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल, कार्यकारी अभियंता आर. एस. टेम्भुर्णे, यांना दिले.
या सन्मानामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पुढील काळात देखील अशाच उल्लेखनीय कामगिरी घडवून आणण्यासाठी निर्धार उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हा परिषदेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.