खोडशिवनी येथे ‘कंपोस्ट खड्डा भरू, गाव स्वच्छ सुंदर ठेवू ‘ अभियानाचा शुभारंभ

0
232

सडक अर्जुनी – तालुक्यातील खोडशिवणी येथे १ मे २०२५ रोजी “कंपोस्ट खड्डा भरू, गाव स्वच्छ सुंदर करू” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद गोंदिया बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता ए. एम. हटवार, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे सल्लागार भागचंद्र रहांगडाले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वासनिक, सरपंच गंगाधर परशुरामकर, पंचायत समिती सदस्य डॉ. रूखीराम वाढई, ग्रामपंचायत अधिकारी ओमेश्वर कापगते आदी उपस्थित होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद गोंदियाचे भागचंद्र रहांगडाले यांनी अभियानाचे उद्देश विशद करून माहिती सांगितली. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता हटवार, सरपंच गंगाधर परशुरामकर, पंचायत समिती सदस्य डॉ.वाढई, ग्रामपंचायत अधिकारी ओमेश्वर कापगते व इतरांच्या हस्ते कंपोस्ट खड्डा भरून अभियानाला सुरुवात करण्यात आली.