कारची झाडाला धडक ; दोघांचा जागीच मृत्यू तर १ गंभीर

0
1135

देवरी -शहरातून गेलेल्या चिचगड रोड वरील मोठा परसटोला गावाजवळ चिचगड वरुन देवरीकडे येत असलेल्या चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रन सुटल्याने मोठा अपघात झाला.

आज सकाळी 4 वाजता दरम्यान चिचगड मार्गे देवरीकडे येत असतांनी चारचाकी वाहनाने (कार) झाडाला जबर धडक दिली. ज्यात देवरी शहरातील दोन युवक ज्यात सोहेब शेख व राजा भारती यांचा जागीच मृत्यू झाला असुन कारमधे सोबत असलेला सलमान शेख हा युवक गंभीर जखमी असल्याची माहीती आहे. फसलेल्या युवकाला काढन्यासाठी स्थानीक नागरीक व देवरी पोलिस प्रयत्न करीत आहेत. सदर घटनेचा तपास देवरी पोलिस करीत आहे.