साप चावा घेतला नंतर मांत्रिक कडे न जाता डॉक्टरांकडे जाण्यावर लक्ष द्या : डॉ. नितीन वानखेडे

0
93

गोंदिया : पावसाळा (Monsoon) येताच साप चावण्याचे प्रकार देखील वाढतात. पावसाळा सुरू होताच काही सापांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो. तर, मुसळधार पावसामुळं सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळं पावसाळ्यात साप बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी जागेचा आडोसा शोधतात. सुरक्षित जागेच्या शोधात अनेकदा साप घरातील अडगळीच्या खोलीत किंवा घराजवळच्या एखाद्या ठिकाणी आसरा शोधतात. अशावेळी अनावधनाने आपण तिथे जातो आणि साप डसतो.
सर्पदंश झाल्यानंतर अनेक जण घाबरुन जातात. गावाकडे अजूनही साप चावल्यानंतर एखाद्या बुवा-बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे विष उतरवण्यासाठी नेण्यात येते. मात्र, या प्रकारामुळं एखाद्या व्यक्तीचा जीवदेखील जाऊ शकतो. साप चावा घेतला नंतर मांत्रिक कडे न जाता वैज्ञानिक तांत्रिक डॉक्टरांकडे जाण्यावर लक्ष देण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.
सर्पदंश म्हणजे काय –
सर्पदंश ही सापांची इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठीची संरक्षक यंत्रणा आहे विषारी साप चावण्याला सर्पदंश म्हणतात. याचा मज्जा संस्था, हृदय किंवा रक्त उत्पादक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. जे वेळेत उपचार न केल्यास प्राण घातक ठरू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत

  • जखमीच्या जागेवर दाताचे ठसे दिसतात.
  • जखमेतून रक्त येते.
  • सूज चाव्याच्या जागेवर किंवा अवयावर सूज येते.
  • प्रभावित जागेच्या रंगात फरक दिसतो.
  • चक्कर येतात.
  • खूप घाम येतो.
  • हृदयाची ठोके वाढतात.
  • वाढलेली हृदयाची गती.

सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसा कराल
सर्पदंश झाल्यावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत ब-याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत.त्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत हा उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे, तो कसा कराल?

  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्वप्रथम जमिनीवर झोपवावे. कारण जर तो व्यक्ती चालत-फिरत असेल तर विष शरीरात लवकर पसरते.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घाबरवू नका त्याला हिंमत द्या. कारण घाबरल्यानंतर रक्तप्रवाह वाढतो अशाने शरिरात विष लवकर पसरते.
  • पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे.
  • विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने हलकेसे बांधावे जोरात आवळून नाही.
  • ज्या व्यक्तीला सापाने दंश केला आहे त्याला घाबरवण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करावा कारण घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष संपूर्ण शरीरात पसरते.
  • शरीराचा जो भाग सापाने चावला आहे तो भाग हृदयाच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अजिबात हालचाल करण्याचा प्रयत्न करू नका.
  • विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने हलकेसे बांधावे जोरात आवळून नाही.
  • आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट चाकून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे.
  • दर 15 ते 20 मिनिटांनंतर बंद 15 सेकंदांसाठी सोडावा व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावा.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये.
  • दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.
  • साप चावलेल्या व्यक्तीच्या हातावर किंवा पायावर बांधलेली कोणतीही वस्तू, जसे की घड्याळ, बांगडी, पायल, ब्रेसलेट किंवा पायल काढा. साधारणपणे साप चावल्यावर सूज येते, त्यानंतर या गोष्टी काढणे कठीण होते.
  • दवाखान्यात जातांना शक्यतो फोनवर डॉक्टरांना कळवावे जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल. 108/102 वर आपत्कालीन अँबुलन्स वाहन वर मदत घ्या.
  • दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा अ‍ॅलर्जी अथवा एकादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.