32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आमदार राजकुमार बडोले यांची नुकसानग्रस्त भागाला भेट

आमदार राजकुमार बडोले यांची नुकसानग्रस्त भागाला भेट

0
60

blank

सडक अर्जुनी ( ७ जुन ) :मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यात घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज धानोरी व टेमनी या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दरम्यान आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोलेनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नुकसान भरपाई तात्काळ देण्याबाबत सबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तसेच महावितरणच्या अडचणी आणि इतर समस्यांचे निराकरणही करण्यात आले.

यावेळी समवेत पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, उपसभापती निशा काशिवार, जि.प. सदस्या सुधा रहांगडाले, माजी सभापती संगीता खोब्रागडे, कृ.ऊ.बा.स. सभापती अविनाश काशिवार, डि.यु. रहांगडाले, सरपंच चेतन पटले , सरपंच वासनिक, मंडळाध्यक्ष विलास बागडकर, गौरेश बावनकर, मनोहर काशिवार, तुकाराम ठाकरे, तेजराम खोब्रागडे, महेश पटले, नायब तहसीलदार जांभुळकर, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank