
तिरोडा-तालुक्यातील वडेगाव जि प क्षेत्रामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनला महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ आणि ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत स्मशानभूमी परिसरात सभापती तेजराम चव्हाण यांच्या हस्ते रस्त्याच्या दुतर्फा बाजुला वृक्षारोपण पार पडले.
यावेळी पंचायत जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरी बघेले, सरपंच श्यामराव बिसेन,साहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुरेखा ब्राह्मणकर, पंचायत समिती तिरोडाचे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी खेमचंद तुरकर, तांत्रिक साहाय्यक डी. लिल्हारे, ग्रामपंचायत सदस्य कविता राहंगडाले , उमेश बिसेन, हरकेश लिल्हारे, ग्राम रोजगार सेवक सावन बिसेनसह यावेळी पर्यावरण विषयी जागृती जनतेमध्ये येण्याविषयी मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरी बघेले यांनी केली कार्यक्रमाचे संचालन उमेश भिसे व आभार प्रदर्शन हेमचंद तुरकर यांनी केले. या उपक्रमाने पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करीत वृक्षारोपणाचा संदेश दिला.