37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय भाकप त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात काॅ.मिलिंद गणवीर यांची जिल्हा सचिवपदी फेरनिवड ‌‌‌‌

भाकप त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात काॅ.मिलिंद गणवीर यांची जिल्हा सचिवपदी फेरनिवड ‌‌‌‌

0
45

blank

गोंदिया- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन 7 जून रोजी येथील कामगार भवन कॉ. अतुलकुमार अंजान सभागृहात उत्साहात संपन्न झाले.यात जिल्हयातील सर्व तालुक्यातील त्यांच्या तालुका अधिवेशनाने निवडलेले 72
प्रतिनिधि शामिल झाले. अधिवेशनाचे उदघाटन पक्षाच्या राज्य सचिवमंडळाचे सदस्य कॉ श्याम काळे(नागपूर) यांनी कॉ. हौसलाल रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत केले. या प्रसंगीं राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार (गडचिरोली)प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन राष्ट्रिय कौंसिल सदस्य कॉ.शिवकुमार गणवीर(भंडारा) यांनी पक्षाच्या घटने प्रमाणे दर तीन वर्षांनी होणारे 25वे राष्ट्रीय महाधिवेशन (पार्टी काँग्रेस) सप्टेंबर महिन्यात चंदीगड येथे होणार आहे. त्यापूर्वी 22ते 24जून पर्यंत नासिक ला राज्य अधिवेशन होणार यात राज्यातील जिल्हा अधिवेशनाने निवडलेले प्रतिनिधी भाग घेणार आहेत. अश्या प्रकारची पक्षांतर्गत लोकशाही भांडवली पक्षात आढडणार नाही .कॉ. शिवकुमार गणवीर यांनी सत्तेत असलेल्या जातंध्य, संप्रदायिक एजेंडा चालवून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, दलित आदिवासी, कष्टकरी वर्गाचे विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे शोषण करुणअदानी-अंबानी सारख्या मोठ्या भांडवलदाराचे पोषण करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरण, व अश्या सरकारच्या विरोधात जनतेची भक्कम एकजूट उभारून संघर्ष तीव्र करण्यासाठी पक्ष जनसंघटना मजबूत करण्याचे आव्हान केले. पक्षाचे जिल्हा सचिव मिलिंद गणवीर यांनी मागील तीन वर्षाचे जिल्हयाचा राजकिय व संघटनात्मक अहवाल सादर केला त्यावर प्रतिनिधींनी चर्चा केल्यानंतर अहवाल पारित करण्यात आले. पुढील तिन वर्षाकरीता अधिवेशनाने 21 सदस्यीय जिल्हा कौंसिलची निवड केल्यानंतर या कौंसिलने 9 सदस्यीय सचिव मंडळाची निवड केली या मध्ये मिलिंद गणवीर (सचिव)परेश दुरुगवार(सहसचिव),अशोक मेश्राम (सहसचिव),  कॉ. रामचंद्र पाटील (कोषाध्यक्ष), व सदस्य म्हणून करुणा गणवीर,प्रल्हाद उके,शालूताई कुथे, शेखर कनोजिया,कल्पना डोंगरे व आमंत्रित सदस्य शंकर बिंजळेकर व गुणवंत नाईक यांचा समावेश आहे. सदर अधिवेशनात नाशिक येथे होणारे राज्य अधिवेषणासाठी 10 प्रतिनिधिची पण निवड झाली. कार्यक्रमाच्या शुरुवातीला कॉ. चरनदास भावे यांच्या हस्ते पक्षाचा लालझेंडा फडकवाण्यात आला, कार्यक्रमाचे संचालन परेश दुरुगवार यांनी तर आभार प्रदर्शन रामचंद्र पाटील यांनी केले.

blank