32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नवेझरी येथील इसमाचा विषारी साप चावल्याने मृत्यू

नवेझरी येथील इसमाचा विषारी साप चावल्याने मृत्यू

0
43

blank

तिरोडा-तालुक्यातील नवेझरी येथिल रहिवासी देवानंद बहादूर उके वय. 33 यांना दि. 31 मे रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास आपल्या शेतामध्ये धानाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्याच्या उजव्या पायाला विषारी सापाने चावल्याने नातेवाईकांनी तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते.परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने व प्रकृती जास्त बिघडल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्याला गोंदिया येथील शासकीय के. टी. एस. रुग्णालयात नेण्यासाठी सांगितले.गोंदिया येथे उपचार सुरु असतांनाच दि. 12 जून ला उपचारादरम्यान देवानंदचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुढील तपास पो. हवा. संजू बांते व पो.शी. प्रणव तिवारी करीत आहे.

blank