
शिक्षक व विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
गोरेगाव :श्री गुरुदेव आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आणि किरसान मिशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, गणखैरा येथे संस्थेचे अध्यक्ष तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी खासदार डॉ. किरसान यांचे स्वागत गाणे व नृत्य सादर करून मंत्रमुग्ध वातावरण निर्माण केले. कॉलेजच्या प्राचार्या सौ. राखी वर्लानी व शिक्षकांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी यावेळी विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेसचे महासचिव रामसिंह चौहान, सचिव इसुलाल भालेकर, संस्था संचालक ॲड. दुष्यंत किरसान, सौ. सीमा दुष्यंत किरसान मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य दिलीप कोल्हे, सुभाष चुलपार, सौ. सीमाताई चंद्रिकापुरे, सौ. देवेश्वरीताई राणे, सौ. अनिताताई श्रीपात्री, सौ. लताताई सोनवणे, सौ. माधुरीताई रहांगडाले, सौ. मंगलाताई पटले, सौ. रियाताई चौधरी, लिलेश कोल्हे, सागर राऊत, सौ. कांचनताई कटरे, कु. साक्षीताई रहांगडाले, कु. मेघाताई कांबळे, सौ. मीनाताई चौधरी, सौ. सविताताई चीचाने, निहाल मेश्राम, सौ. विनिताताई चौरेवार, सौरभ वरवाडे, विनोद देशमुख, कीर्तेश्वर बावनकर, गिरीश गावराने, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १२ वी ची विद्यार्थिनी कु. गायत्री भंडारी हिने तर आभार प्रदर्शन कु. हर्षा वृंद्रा हिने केले.





