32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अधिकाराचे हनन होणार-माजी मंत्री देशमुख

जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अधिकाराचे हनन होणार-माजी मंत्री देशमुख

0
69

blank

गोंदिया, 30 जुलै-राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता त्रस्त आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधान सभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या घटक पक्षांनी जनतेला नानाविध आश्वासने देवून पुन्हा सत्ता हस्तगत केली. आता मात्र महायुती सरकारला निवडणुकीतील आश्वासनांचा विसर पडला आहे, अशी टिका राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. ते 30 ऑगस्ट रोजी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्ष मेळाव्या निमित्य आले असता द्वारका सभागृहात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते.
देशमुख पुढे म्हणाले, राज्यात सत्ता स्थापन होऊन 9 महिने लोटले असताना या सरकारने एकही आश्वासनाची पुर्तता केली नाही. धान उत्पादकांना केंद्रावर धान विक्री करून 3 महिने लोटूनही चुकारे मिळालेले नाहीत, बोसची रक्कम खात्यात जमा झाली नाही. राज्य कृषी मुल्य आयोगाने धानाला 4500 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची शिफारस केली असताना केवळ 2369 रुपये प्रति क्विंटल दर शासनाने देऊन धान उत्पादकांची थट्टा केल्याचे ते म्हणाले. ऐन खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण केला जात आहे. बांधकाम कंत्राटदारांची सरकारने 90 हजार कोटींची रक्कम थकविली आहे. यामुळे आता शेतकर्‍यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करीत असल्याचे देशमुख म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकार गैरवापर करीत आहे. जन सुरक्षा विधेयकामुळे सरकारच्या विरोधात बोलता, टिपणी करता येणार नाही. यामुळे नागरिकांच्या अधिकारांचे हनन होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, युवानेता रविकांत बोपचे उपस्थित होते.

महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणे, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय, जातीनिहाय जनगणना करणे आदिंसह विविध मागण्यांना घेऊन व ओबीसींमध्ये जनजागृतिच्या उद्देशाने 9 ऑगस्ट क्रांतीदिनी नागपूर येथून दुपारी 12 वाजता मंडल यात्रेचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर ही यात्रा राज्यात विविध ठिकाणी भ्रमण करणार आहे. यात्रेत नागरिकांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील अनिल देशमुख यांनी यावेळी केले.

blank