40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक परशुराम विद्यालय मोहगांव बु. येथे राष्ट्रीय हरित सेना ईको क्लबच्या सहकार्याने 200...

परशुराम विद्यालय मोहगांव बु. येथे राष्ट्रीय हरित सेना ईको क्लबच्या सहकार्याने 200 झाडांचे वृक्षारोपण

0
128

blank

गोरेगाव,दि.३१- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगांव बु. येथे राष्ट्रीय हरित सेना ईको क्लब द्वारा एक पेड माँ के नाम उपक्रमातर्गत शालेय परिसरात 200 विविध देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णकांत बिसेन यांच्या मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डिलेश्वर पटले तसेच भूमेश्वर पारधी,हेतराम पटले,भीमसेन रहांगडाले,सौ.रिनाताई सोनवाने,सौ.सविता सोनवाने,किरण नेवारे व पालकवर्ग उपस्थित होते.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संंरक्षाणाचा संकल्प घेतला.प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड दत्तक घेऊन निगा राखणे व जगविण्याची शपथ घेतली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक विनोद मेश्राम,टेकचंद इळपाचे,श्रीमती भारती कटरे,हिमांशी मोहने,कु.अनिता मेंढे,ममता गणवीर,श्री के.बी.पारधी व दिनेश बोपचे आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

blank