
१ ते १७ आँगस्टपर्यंत वसतिगृह व आधारकरीता अर्ज प्रवेश प्रकिया
गोंदिया,दि.३१ःगेल्या शैक्षणिक सत्रापासून राज्यसरकारने राज्यात ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा केली.त्यापैकी फक्त ५४ वसतिगृह मागील शैक्षणिक सत्रात सुरु करण्यात आले.त्यानंतर २०२५-२६ या शैक्षणिक सत्राची सुरवात होऊनही प्रवेश प्रकिया राज्यसरकारने सुरु केलेली नव्हती.त्यामुळे ओबीसी अधिकार मंच,ओबीसी युवा अधिकार मंच,ओबीसी सेवा संघाच्यावतीने शासनाचे लक्ष पावसाळी अधिवेशन काळात निवेदन देऊन वेधण्यात आले होते.तसेच पत्रपरिषदेतूनही सरकारला इशारा देण्यात आलेला होता.त्या आंदोलनात्मक भूमिकेची दखल घेत राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणेच्या संचालक सोनाली मुळे यांनी ३० जुर्ले २०२५ रोजी प्रवेश प्रकिया १ आँगस्ट २०२५ पासून सुरु करण्याचे परिपत्रक काढले आहे.





