38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ कोहळी समाज मंडळाच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक परशुरामकर यांचा सत्कार

कोहळी समाज मंडळाच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक परशुरामकर यांचा सत्कार

0
110

blank

सडक अर्जुनी,दि.३१ः-गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (GDCC Bank) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोहळी समाजाचे तीन मान्यवर प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून आले असून, या उल्लेखनीय यशाबद्दल कोहळी समाज विकास मंडळ, गोंदिया यांच्या वतीने गंगाधर परशुरामकर यांचा शाल, सन्मानपत्र व फुलांचे बुके देऊन घरी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कोहळी समाज विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवांनी उपस्थित राहून विजयी संचालकांचे अभिनंदन केले.उपस्थित मान्यवरांमध्ये अमोल मुंगमोडे, किशोर डोंगरवार, जगन लंजे, चामेश्वर गहाणे, चोपराम गोबाडे, रामदास बोरकर, जयंत लांजेवार, अशोक हांडेकर, प्रेम लांजेवार व रामदास कापगते ,गणेश कापगते उपसरपंच, प्रवीण गहाणे सरपंच, उद्धव परशुरामकर ,दुधराम डोंगरवार, अरविंद कापगते, डी पी. पर्वाते , एम एम परशुरामकर , सोहन कापगते, अशोक मस्के, सचिन गोपल , सचिन डोंगरवार, यांचा समावेश होता.सत्कार सोहळ्याचे आयोजन हे केवळ अभिनंदन नव्हे तर समाजाच्या एकजुटीचे व प्रगतीकडे वाटचाल करण्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

blank