33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ तंबाखू खर्रा सेवनाने बुद्धी व रक्त कमी होते-किशोर मलेवार

तंबाखू खर्रा सेवनाने बुद्धी व रक्त कमी होते-किशोर मलेवार

0
79

तिरोडा-तालुक्यातील भिवराम विद्यालय वडेगाव येथे व्यसनमुक्ती कार्यकर्ता किशोर मलेवार यांनी मार्गदर्शनात तंबाखुमुक्त शाळा कार्यक्रात मार्गदर्शनात तंबाखू खर्राचे सेवन लहान मोठ्याना घातक आहे.आपल्या देशात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले असून कर्करोग थांबविण्यास विद्यार्थ्यांनी व पालकांनी तंबाखू खर्रा सेवन बंद करून निर्व्यसनी बालक शसक्त भारताला गरज आहे .कोणत्याही व्यक्तीला तंबाखू, खर्रा चे व्यसन लागले तर तंबाखूतील निकोटिन रसायन मुलांचे बुद्धीवर विपरीत परिणाम करून बुद्धी कमजोर व शरीरात कुपोषण वाढून रक्त कमी होत असते.व्यसनाचे दुष्परिणाम लहान वयातच समजाऊन सांगणे महत्वाचे आहे कारण एकदा व्यसनाच्या पिंजऱ्यात सापडला की व्यसनी व्यक्ती स्वतःचा शारीरिक,कुटुंबाचा मानसिक आर्थिक नुकसान करतो आणि तरुण वयातच शरीराने निकामी होते. विद्यार्थ्यांना खायेंगे गेम घेऊन आम्ही भारताचे सृजन नागरिक तंबाखूचे व्यसन करणार नाही अशी शपथ घेण्यात आली.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक डि.आर.गिरीपुंजे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.