38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष  प्रदर्शनाचे उद्घाटन...

विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष  प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारला

0
69

blank

स्वातंत्र्याची अमृत गाथा या विषयावरील मल्टिमीडिया छायाचित्र  प्रदर्शन

  • नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन
  • माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचा उपक्रम

गोंदिया, दि. 12: माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि जिल्हा प्रशासन, गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 15  ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नविन प्रशासकीय इमारत येथे विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा या विषयावर मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या बुधवारी (दि.13) सकाळी 11 वाजता होणार आहे. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. सर्वांना प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंदीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले आहे.

blank