२0 टक्के रोवण्या अजूनही अपूर्णच

0
4

तिरोडा दि.27:तालुक्यातहव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने आजही अनेक शेतकर्‍यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेली खरिपाची शेती पाण्याविहीन कोरडी पडली आहे. माजी आमदार दिलीप बंसोड यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शुक्रवार (दि.२६) पिकांची पाहणी केली. त्यात २0 टक्के रोवण्या आजही अपूर्णच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वडेगाव क्षेत्रात पावसाच्या कमी प्रमाणामुळे अनेक गावांत २0 टक्के रोवण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी डोक्यावर हात ठेवून आकाशाकडे नजरा वळविल्या आहेत. खोळंबलेल्या रोवण्यांची कृषी विभागाकडून चौकशी करण्यात यावी व त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी