30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत सिरेगावबांध येथे पर्यावरण पूरक गौरी विसर्जन

ग्रामपंचायत सिरेगावबांध येथे पर्यावरण पूरक गौरी विसर्जन

0
92

अर्जुनी-मोर. -अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांधच्या वतीने पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन कृत्रिमरित्या गौरी विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत सिरेगावबांध सहभाग नोंदवून उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता गावातील महिलांनी तलाव,बोळी व नाल्यांवर विसर्जन न करता ग्रामपंचायत तर्फे तयार केलेल्या निर्माल्य विसर्जन स्थळामध्ये दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ला सकाळपासून गौरी विसर्जनास सुरवात केली. पर्यावरण पुरक विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण टाळते प्लास्टिक आणि इतर हानीकारक वस्तू पाण्यात विसर्जन न केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी होते. जलचचरांवर आणि त्यांच्या अधिवासावर होणार परिणाम कमी होतो. तसेच रासायनिक रंग आणि साहित्याचा वापर तळल्यास प्रदूषण कमी होते. विविध रोगांचा प्रादुर्भाव बळावला असतांना मानवी आरोग्य रक्षणाची गरज आहे. निर्माल्य विसर्जन स्थळात विसर्जित वस्तू पासून तयार झालेला निर्माल्य खत हा ग्रामपंचायतने लावलेल्या झाडांना पुरविल्या जाते. त्यामुळे त्या निर्माल्याचा पुनर्वापर केला जातो. माझी वसुंधरा ६.० अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करणे. या दिशेने ग्रा.पं.सिरेगावबांध ची मोठ्या प्रमाणात वाटचाल करीत आहे. सदर कार्यक्रमा प्रसंगी जि.प.सदस्या सौ.रचना चामेश्वर गहाणे,सरपंच सौ.सागरताई दिलीप चिमणकर,पोलीस पाटील भुमिता गहाणे,आशासेविका सौ.रेखा घोडाम, सौ.शीला गहाने, यामिना गहाने, सिंधुबाई गहाने, मनिषा गहाने, वनिता गहाने, रंजना गहाने, वर्षा गहाने, सुमेस्वरी गहाने, मंदा कापगते, प्रिया कापगते, इंदू कापगते, अर्चना घोडाम, अश्विनी घोडाम, जयवंता कापगते, भूमीता नेवारे, ज्योती कापगते, तिलोत्तमा कापगते, ललिता वाळवे आदि महिला यांच्या उपस्थितीत पर्यावरण पूरक गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला.