28.2 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ घाटकुरोडा येथे वीज पडून एक बैल ठार

घाटकुरोडा येथे वीज पडून एक बैल ठार

0
160

चित्रा कापसे/तिरोडा,दि.२८ःतालुक्यातील घाटकुरोडा येथील फागोदास भाकरू विठुले यांच्या शेतात असलेला एक बैल आज दि.२८ ला दु. 12.00 वाजेच्या सुमारास विज पडल्याने जागीच ठार झाला. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत शासनाने त्वरित द्यावी अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्याचे ठार झालेल्या बैलाची किंमत अंदाजे 30 हजार रुपय आहे . शेतकऱ्यांचे जनावरे मोकळ्या परिसरात चराईकरीता मोठ्या संख्येने होते. त्यामध्ये थोड्या अंतरावर असलेल्या बैलावर वीज पडल्याने त्या बैलाचा मृत्यू झाला.बाजूलाच असलेल्या शेतात निंधन करीत असणार्या महिला मजूरही थोडक्यात बचावल्या आणि मोठी जीवित हानी टळली.

blank