27.5 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर येथे कर्करोग तपासणी शिबीरात २०९ नागरिकांची तपासणी

प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर येथे कर्करोग तपासणी शिबीरात २०९ नागरिकांची तपासणी

0
135

गोंदिया,दि.२८ः कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन गोंदिया जिल्ह्यात दि.21 ऑगस्ट पासुन दाखल झाली असुन आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 33 आरोग्य संस्थेतील गावात मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन द्वारे महिला व पुरुषांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.

आज दि.28 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 209 नागरिकांनी मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये केली आपली तपासणी केली असुन त्यात 159  मुख कर्करोग,30 महिलांची गर्भाशय कर्करोग,20 महिलांची स्तन कर्करोग संबधाने तपासणी केल्याची माहीती प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ.अमर खोब्रागडे यांनी यावेळी दिली आहे.मोबाईल व्हॅनमध्ये ए.सी.तपासणी कक्ष असून मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र आहे.

या व्हॅनद्वारे शहरासह ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता या व्हॅनमध्ये असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी दिली आहे..

मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.चिंधालोरे,मुखरोग तज्ज्ञ डॉ.प्रनब शेखर व शल्यचिकित्सक डॉ.डहाके यांचे सह त्यांची चमु द्वारे तपासणी करण्यात आली.तपासणी झालेल्या संशयितांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

कॅन्सर तपासणी शिबीर वैद्यकिय अधिकारी डॉ.अमर खोब्रागडे व डॉ.तुलशी भगत यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.कॅन्सर तपासणी शिबिराला जि.प.सदस्य रतनारा अंजली ताई अटरे,भानपुर येथील सरपंच मा सरिता ताई कटरे,उपसरपंच योगेश पतेह तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव, तालुका पर्यवेक्षक महेश चिंधालोरे व बघेले यांनी भेट देवुन दिली पाहणी केली. आणि यावेळी अधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत उपकेंद्रातील सर्व अधिकारी,कर्मचारी व आशा सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

blank