अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील चापटी ते खांबी हा डांबरीकरण रस्ता उखल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार विद्यार्थी वर्गाला प्रवास करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.हा मार्ग जलद प्रवास करण्याकरीता सु:खकर व आरामदायक असल्याने अनेक पर्यटक हा मार्ग नवेगावबांधकडे जाण्यास निवडतात.मागील १५ ते २० वर्षा पुर्वी हा संबंधित डांबरीकरण रस्ता बनविण्यात आला होता.तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याची कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नसल्याने हा रस्ता खड्डेमय झाला आहे.पाऊस आले कि लवकरच या रस्त्यावरील खड्ड्यांना डबक्यांचा स्वरूप आल्याचे दिसते आहे.याकडे स्थानिक जनप्रतिनिधीनी काळजीपूर्वक विशेषता लक्ष देऊन त्वरित सदर नवीन डांबरीकरण रस्त्याच्या कामाला मंजुरी देऊन हा मार्ग सुरळीत करावा अशी मागणी दररोज ये – जा करणारे गावाजवळील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरीक विशेषता शाळकरी विद्यार्थी हे करीत आहेत.





