31.8 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ गोंदियाच्या प्रेस ट्रस्टचा १० वा स्थापना दिन १ सप्टेंबर रोजी

गोंदियाच्या प्रेस ट्रस्टचा १० वा स्थापना दिन १ सप्टेंबर रोजी

0
97

प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान होणार

गोंदिया,२९ऑगस्ट- प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा १० वा स्थापना दिन आणि सत्कार समारंभ सोमवार, १ सप्टेंबर रोजी येथील हॉटेल जिंजर येथे साजरा केला जाणार आहे. परंपरेनुसार यावर्षीही या प्रसंगी मान्यवरांचा सन्मान केला जाईल.

विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी अध्यक्षस्थानी असतील, तर आमदार विनोद अग्रवाल (गोंदिया), आमदार राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), आमदार विजय राहांगडाले (तिरोडा), आमदार संजय पुरम (आमगाव-देवरी), गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे ​​अध्यक्ष राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर प्रमुख पाहुणे असतील. जिलाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे आणि अदानी पॉवर लिमिटेड (तिरोडा) चे प्रकल्प प्रमुख मयंक दोशी प्रमुख पाहुणे असतील.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गोंदिया जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींमध्ये काळूराम अग्रवाल (कै. रणजितभाई जसानी जिल्हा गौरव समाज सेवा पुरस्कार), निवासी उपजिलाधिकारी भैयासाहेब बेहरे (कै. रामकिशोर कटकवार जिल्हा गौरव प्रशाश्कीय पुरस्कार), शिवकुमार शर्मा (कै. रामदेव जैस्वाल जिल्हा गौरव साहित्यरत्न पुरस्कार), तुकाराम बोहरे (कै. मोहनलाल चांडक जिल्हा गौरव कृषक रत्न पुरस्कार), मंगेश बोरकर (सहयोग संस्था जिल्हा गौरव शिक्षक पुरस्कार), जीवनलाल रजवानी (कै. दीपम देवेंद्रभाई पटेल जिल्हा संगीत रत्न पुरस्कार), डॉ. निर्मला जयपुरिया (कै. प्रा. योगेश नासरे जिल्हा विशेष पुरस्कार) आणि “एक पहल ऐसी भी ” संस्थेला विशेष पुरुस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.ज्येष्ठ पत्रकार आणि भवानी टाइम्सचे संपादक चंद्रकांत खंडेलवाल यांना 2025-26 या वर्षासाठीच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष जयंत शुक्ला यांनी दिली.

प्रेस ट्रस्टचे गोंदियाचे उपाध्यक्ष जयंत शुक्ला, हिदायत शेख, सचिव संतोष शर्मा, खजिनदार रवी आर्य, कार्यकारिणी सदस्य अंकुश गुंडावार, हरेंद्र मेठी, आशिष वर्मा, जावेद खान, कपिल केकत, प्रमोद नागनाथे, मनोज ताजने, मुकेश शर्मा, राजन चौबे, नरेश राहिले, रविंद्र तुरकर, भरत घासले, राहुल जोशी, योगेश राऊत, बिर्ला गणवीर, अर्चना गिरी, योगेश राऊत, दीपक जोशी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

blank