गोरेगाव,दि.२९ः तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथे परिविक्षाधीन अधिकारी साईकिरण नंदा यांनी आज २९ ऑगस्टला येथे भेट देत ग्रामपंचायतीचा कामकाज समजून घेतले.तसेच ग्रामपंचायत मधील 1 ते 33 नमुने तपासणी केले.त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू,विवाह नोंद,आपले सरकार सेवा केंद्र आदीची दफ्तर तपासणी केली.यावेळी त्यांनी गावातील शाळा,आंगणवाडी केंद्र,आरोग्य उपकेंद्र, पशु वैदकीय दवाखाना,विद्यालय तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत झालेल्या घरकुल बांधकाम व मग्रारोहयो अंतर्गत गुरांचा गोठा लाभार्थ्यांच्या घरी भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत मुंडीपारच्या सरपंच प्रेमलता राऊत, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी टी.डी.बिसेन,वैशाली खोब्रागडे,ग्रामपंचायत अधिकारी अरविंद के.साखरे,उपसरपंच जावेद खान,सुनिल वाघाडे,रोहित पांडे,अजय नेवारे,विनेश बावनकर,रवी गमधरे,लीलाधर भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.





