25.4 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ आमदार बडोले यांनी रामनगर येथे व्हॉलीबॉल खेळाडुंना दिले बळ

आमदार बडोले यांनी रामनगर येथे व्हॉलीबॉल खेळाडुंना दिले बळ

0
51

अर्जुनी-मोर.-तालुक्यात सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.त्यानिमित्त अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी ता.31 ऑगस्ट रोजी अर्जुनी-मोर. तालुक्यातील डोंगरगाव,कवठा,रामनगर अशा विविध गावांना भेट देवुन गणरायाचे दर्शन घेवुन जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.तालुक्यात सात बंगाली कॅम्प आहेत.बंगाली बांधव मोठ्या धार्मिक वृत्तीचे असुन या सर्व कॅम्प वर गणेशोत्सव व दुर्गा उत्सवासह वर्षभर विविध कार्यक्रम केले जातात.अशातच रामनगर येथे गणेशोत्सवानिमीत्त व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी स्पर्धास्थळी भेट देली

गणेश उत्सवाच्या निमित्ताने मौजा रामनगर येथे स्थानिक क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी स्पर्धास्थळी भेट दिली. आणि खेळाडूंशी संवाद साधला. या स्पर्धेत गावातील तसेच परिसरातील अनेक संघ सहभागी झाले आहेत.यावेळी माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यशवंत गणवीर, सभापती पंचायत समिती अर्जुनी मोर सौ. आम्रपालीताई डोंगरवार, माजी जि. प. सदस्य
किशोर तरोणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, मत्स्य संस्था अध्यक्ष गोठणगाव राजहंस ढोके, संजय खरवडे, चेतन नाकाडे, मिथुन टेंभुर्णे, कांतीलाल डोंगरवार, सरपंच रामनगर संतोष मिर्धा, शेफालीताई रॉय, मिनाताई मंडल, अशोक सरकार, सविताताई मंडल, हरिदास सरकार, गोविंद मंडल, भरत विश्वास, निखिल हलदार आदी मान्यवर उपस्थित होते.

blank