24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ खा. प्रफुल पटेल यांनी गणेशोत्सव मंडळांना भेट देवून घेतले श्री गणरायाचे दर्शन...

खा. प्रफुल पटेल यांनी गणेशोत्सव मंडळांना भेट देवून घेतले श्री गणरायाचे दर्शन व आशीर्वाद

0
22

भंडारा : खासदार प्रफुल भाई पटेल हे 31 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. प्रफुल पटेल यांनी दौऱ्यादरम्यान भंडारा शहरातील विविध श्रीगणेश उत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
blank
या प्रसंगी खासदार पटेल यांनी गणेशपूरचा राजा – सन्मित्र गणेश मंडळ (गणेशपूर), मानाचा महागणपती – नवबजरंग गणेशोत्सव मंडळ (बजरंग चौक), म्हाडाचा गणपती – म्हाडा कॉलनी, भृशुंड गणेश मंदिर – मेंढा रोड तसेच भंडाराचा राजा – गणेश उत्सव मंडळ (छोटा बाजार गांधी चौक) येथे जाऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच सर्व जनतेचे जीवन सुख, समृद्धी व मंगलमय क्षणांनी परिपूर्ण होवो, अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली. या सर्व मंडळांतील पदाधिकारी व उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नाना भाऊ पंचबुद्धे, सुनील फुंडे, श्रीकांत शिवणकर, अनिल अहिरकर, एकनाथ फेंडर, सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाड, महेंद्र गडकरी, शेखर गभने, हेमंत महाकाळकर, मनीष वासनिक सहित मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

blank