# रक्तदान, आरोग्य शिवीर,महिला व ज्येष्ठांचे सन्मान सह विविध उपक्रमातून सामाजिक चालना देणारे उपक्रमांना युवकांनी दिली साथ
# नवयुवक गणेश मंडळाचे उपक्रम.
आमगाव- तालुक्यातील ठाणा येथील नव युवकांनी गणेश उत्सवानिमित्त एक गाव एक गणपती व सामाजिक चालना देणाऱ्या उपक्रमाना स्फूर्तपणे चालना देत अनेक समाजिक उपक्रम आयोजित करून जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
आमगाव तालुक्यातील आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेले ठाणा या गावातील युवकांनी एकत्रितपणे येऊन गावात एक गाव एक गणपती या उपक्रमाला हाती घेत स्फूर्तपणे राबवण्यासाठी सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन श्री गणेशजी स्थापना करून गणपती उत्सवाला प्रारंभ केले. एक गाव एक गणपती या उपक्रमाला हाती घेत नवयुवक गणेश मंडळ यांनी २७ आगष्ट गणेश स्थापना दिनापासून ७ सप्टेंबर अश्या १२
दिवस पर्यंत चालणाऱ्या सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यातदिले आहे. मा.उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आमगाव ठाणे येथील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पूर्वीच गणेश उत्सव निमित्त ध्वनी प्रदूषणाला लक्षात घेऊन डीजे मुक्त मोहिमेला साथ देण्यात आली.
नवयुवक गणेश उत्सव मंडळ ठाणा येथील युवकांनी गणेश उत्सवात सामाजिक ध्येय बाळगून अनेक उपक्रमांना चालना देत जिल्ह्यात एक आदर्श घडविण्याचे कार्य केले आहे. गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश मेश्राम, उपाध्यक्ष आकाश पारधी, सचिव नितेश महारवाडे, शुभम कावळे,अनिल आग्रे, पोलीस पाटील प्रदीप बावनथडे, प्रशांत देशकर,श्रीराम मेश्राम,प्रतीक बापचे, संदीप ठाकरे,राजेश सोनवणे, भरत बडवाईक,नितेश चौधरी,महेंद्र भेलावे, विजेंद्र बनकर, इसुलाल निनावे,दीपक कटरे,भारत नागरिकर, महेंद्र वंजारी, सुमित बारापात्रे, प्रेमकुमार जोशी, धर्मराज चनाप,विकास देशकर,चैतन्य वंजारी,नवीन मेश्राम व गावातील नागरिकांनी सहकार्य दर्शवून सामाजिक उपक्रमांना साथ दिली आहे.
गणेश उत्सव निमित्त युवकांनी एक सप्टेंबरला रक्तदान शिबिर, आरोग्य शिवीर,ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सत्कार कार्यक्रम घेण्यात आले.आयोजित रक्तदान कार्यक्रमात युवकांनी स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आले . यावेळी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्राचार्य सी.जी. पाऊलझगडे, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक तिरुपती राणे,सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर, प्रा. सुभाष आकरे, सरपंच छायाताई देशकर,पोलीस पाटील प्रदीप बावनथडे,ग्रामपंचायत सदस्य सूरसाम कटरे,अनिरुद्ध जोशी,अशोक मेश्राम, नीरज बाजपाई, चंद्रभान पारधी,गंगाराम बावनथडे, महेंद्र भेलावे,भोजराज बेंदवार आदी जेष्ठ मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील प्रदीप बावनथडे यांनी केले,यावेळी त्यांनी गणेश उत्सव निमित्त युवकांनी घेतलेले सामाजिक ध्येयाची लक्षपूर्तीसाठी पोलीस निरीक्षक यांनी केलेले मार्गदर्शन व सामाजिक भावना हे लक्षात घेऊन एक गाव एक गणपती व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी युवकांनी घेतलेले पुढाकार नक्कीच नवी दिशा देणारे ठरणार अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी या उपक्रमांना मिळत असलेला स्फुर्त प्रतिसाद याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी आमगाव तालुक्यात एक गाव एक गणपती या उपक्रमाला मिळत असलेले उत्साह व ध्वनी प्रदूषणाला लक्षात घेता तालुक्यात गणेश उत्सव मंडळांनी ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत असलेले डीजे वाद्याला टाळण्याचा संकल्प घेऊन डीजे मुक्त मिरवणूक साठी घेतलेले पुढाकार योग्य दिशा देणारी प्रेरणा आहे,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणा येथील युवकांनी घेतलेली भूमिका व विविध उपक्रम व कार्य नक्कीच नवी पिढीला प्रेरणा देणारे आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केली . सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी नवयुवकांनी चालविलेले अनेक सामाजिक उपक्रम हे गावालाच नाही तर राज्याला दिशा देणारे आहे, रक्तदानातून केलेले मानव कार्य व ज्येष्ठांचे सत्कार विद्यार्थ्यांना देणारे शैक्षणिक प्रोत्साहन व डीजे मुक्त यातून ध्वनी प्रदूषणाला लक्षात घेता मिळणारी साथ ही योग्य मार्गदर्शक व प्रेरणा देणारे कार्य आहे.गावातील अनेक सामाजिक उपक्रमात आपल्या माध्यमातून मदत व सहकार्य देणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी नवयुवक गणेश उत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक व समाजाला योग्य दिशा देणारे आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे , सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर,प्राचार्य सी.जी. पाउलझगडे,प्राध्यापक सुभाष आकरे, सेवाकार्यात अग्रेसर असणारे पोलीस पाटील प्रदीप बावनथडे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.आयोजित रक्तदान शिबिरात लाईफ लाईन ब्लड बँकचे डॉ.अविनाश भाबरे, सहाय्यक स्वाती मेश्राम, पिंकी शिवरकर,वैष्णवी घोन्नाडे,सुमित उदापूरकर,हरीश ठाकरे, तसेच आरोग्य शिवीरला डॉ. सचिन बारई यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहाय्यक ईश्वर निपाने, शारदा वाघधरे,आरोग्य सहायिका प्रवीण रायपुरे,प्रशांत बी.शेंडे, पूर्वेना कुंभलवार,कुसुम भोयर,कल्पना देशमुख यांनी सहकार्य केले.
नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने चालणाऱ्या उपक्रमात ७ सप्टेंबर पर्यंत सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य विषयी कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. तर या उपक्रमाना नागरिकांची साद मिळत आहे. जनतेने आयोजित सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य व लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





