25.7 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ सामाजिक बांधिलकी जपणारी ग्राम पंचायत अधिकारी युनियन व पतसंस्था-सीईओ मुरगानंथम एम.

सामाजिक बांधिलकी जपणारी ग्राम पंचायत अधिकारी युनियन व पतसंस्था-सीईओ मुरगानंथम एम.

0
169

गोंंदिया,दि.०१ः-गोंदिया जिल्हा परिषद ग्राम पंचायत अधिकारी युनियन वार्षिक अधिवेशन व ग्राम पंचायत अधिकारी पतसंस्था वार्षिक आमसभा पलाश द जंगल रिसॉर्ट दांडेगाव या ठिकाणी आयोजित सभेच्या प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानंथम एम यांनी गौरवद्गगार काढले. यावेळी बोलताना जिल्हा परिषद मध्ये अनेक कर्मचारी संघटना कार्यरत आहे, मात्र ग्राम पंचायत अधिकारी संघटना नेहमी जिल्हा परिषद प्रशासन ला सहकार्य करून सकारात्मक राहून कर्मचार्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करते. सदर ग्राम पंचायत अधिकारी पतसंस्थेच्या माध्यमातुन अनेक सामाजिक बांधिलकी सह अडचणी मध्ये सभासद व त्यांच्या परिवाराला मदत होईल असे कार्य कमलेश बिसेन यांचे अध्यक्षतेखाली असून एकजुटता व सक्रिय सहभागाची प्रशंसा केली. तसेच शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना आपला संवर्ग यशस्वी पणे विपरित परिस्थिति मध्ये ही राबवत असून त्यासाठी येणार्‍या अडचणी सोडविणे कामी व नजरचुकीने झालेल्या चुका दुरुस्त करणे कामी मी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद कायम तुमच्या सोबत असल्याचे ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. सदर आमसभा व अधिवेशन जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला फनिद्र कुत्तीरकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य,मधुकर वासनिक उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत,आनंद पिंगळे गट विकास अधिकारी गोंदिया, श्री गिरीपुंजे सहायक गट विकास अधिकारी उपस्थित होते.blankप्रास्ताविक मध्ये कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष यांनी संस्था व संघटनेच्या कामाची माहिती देवुन विपरित परिस्थितीत काम करणार्‍या संवर्गाला एकापेक्षा अधिक कामे सांभाळून ग्राम पंचायतचा यशस्वी गाडा चालविताना तारेवरची कसरत करावे लागत असल्याचे सांगितले.यावेळी फणींद्र कुत्तीरकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभागाचे पालक अधिकारी मधुकर वासनिक यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी विशेषत्वाने स्वप्नंपूर्ती भवन इमारत ग्राम पंचायत अधिकारी संघटना व पतसंस्थेची भव्य कार्यालय इमारतीचा 3d प्रिंट छायाचित्र चा अनावरण मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व मान्यवर यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी धर्मपाल तूरकर,गणवीर जमईवार,युवराज मनापुरे,भोजराज हुड, लोमेष बाळने,सुनील टेंभरे,विनोद ढोमणे,विलास रामटेके,यांचा सत्कार करण्यात आला तसेच सभासद यांच्या पाल्या पैकी इयत्ता दहावी मध्ये औरव बबलु लिल्हारे, प्रजोत प्रभाकर गिऱ्हेपुंजे, सौम्य दयानंद फटिंग, कु.चाणाक्षी नरेश बडोले, कु.वैष्णवी परमेश्वर नेवारे, व बारावी मध्ये अथर्व पवनकुमार पवार, अक्षद किशोर आचले, कु.कल्याणी सुरेश रहांगडाले, कु.डिंपल रामेश्वर जमईवार,श्लोक दारासिंग बागडे,परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उच्च शिक्षण मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थात अक्षद किशोर आचले, कु.नंदिनी मनीष खाडे,रोहित सुभाष तिडके,अथर्व हौसिलाल पटले व कु.आकांक्षा संजय मुळे ह्या विद्यार्थांचा हि सत्कार करण्यात आला व सुरेश वाघमारे.रविंद्र औरासे,किशोर आचले,दयानंद फटिंग,भारती वाघमारे,धनेंद्र सोनकनवरे यांचा विस्तार अधिकारी पदावर पद्दोनत्ती झाल्याबद्दल सत्कार काण्यात आले. तर देशात डव्वा ग्रामपंचायत करिता विशेष कार्य पुरुरुस्कार सन्मानित सिंधू सूर्यवंशी तर राज्य स्तरीय आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार सुमेद बन्सोड, रामेश्वर जमईवार, कुलदीप कापगते,राजकुमार पटले,धर्मराज लंजे तसेच जिल्हा स्तर ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रदीप ठाकरे,खिलमेश्वरी बैस, सरिता ब्रम्हवंशी, भारती वाघमारे,राजू मेश्राम, लीना मसराम, छन्यू कापगते,बालकुमार फटिंग,दारासिंग बागडे, नम्रता रंगारी,सुरेश गोरे,विनोद ढोमणे,दीपक फुले, महेश खडके, तेजस्विनी टेकाम,चंद्रकला कटरे ग्राम पंचायत अधिकारी यांचा ही सत्कार करण्यात आला.संचालन कुलदीप कापगते तर आभार शैलेश परिहार यांनी मानले.सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कमलेश बिसेन उपाध्यक्ष दयानंद फटिंग खजिनदार भागेश्वर चव्हाण तसेच संस्थेचे संचालक रामेश्वर जमईवार,सचिन कुथे,सुनील पटले रविंद्र अंबादे,ओमेश्वर बिसेन, सिंधू सूर्यवंशी, निशा टेंभरे तज्ञ संचालक तारेश कुबडे,नरेंद्र अतकरे, स्विकृत संचालक ज्योती बिसेन हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी कमलेश बिसेन (जिल्हाध्यक्ष), कुलदीप कापगते(सरचिटणीस), सचिन कुथे,भारती वाघमारे (उपाध्यक्ष), शैलेश परिहार(कोषाध्यक्ष), योगेश रुद्रकार (सहसचिव) , योगराज बिसेन, रजनी सहारे(राज्य कौन्सिलर),रामेश्वर जमईवार(प्रसिद्धी प्रमुख )रितेश सहारे ,सुरेश वाघमारे,टिकाराम जनबंधू(जिल्हा संघटक),प्रदीप ठाकरे, किशोर आचले(कायदे सल्लागार),नरेंद्र गोमाशे,नम्रता रंगारी(जिल्हा निमंत्रक ) उपस्थित होते.

blank