25.4 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ तुमसर येथे पोवार समाज कार्यालयात हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

तुमसर येथे पोवार समाज कार्यालयात हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

0
37

​तुमसर: स्थानिक पोवार समाज राजा भोज कार्यालय येथे रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे अतिशय भव्य आणि नेटके आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तुमसर शहर तसेच तालुक्यातील विविध गावांतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
​हा कार्यक्रम ममता बिसेन यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगीताई राहांगडाले यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे समाजात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.​कार्यक्रमाच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत खालील महिलांनी विशेष परिश्रम घेतले.​रामेश्वरी पटले,​भूमेश्वरी रहांगडाले,​ज्योती रिनाइत,​यांच्यासह इतर सहकारी महिलांच्या मदतीने हा सोहळा अतिशय छान पद्धतीने पार पडला. उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाण दिले आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली. तुमसर शहरातील आणि तालुक्यातील महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

blank