24.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ शासकीय व खाजगी आस्थापनामध्ये महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती बंधनकारक

शासकीय व खाजगी आस्थापनामध्ये महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती बंधनकारक

0
62

गोंदिया, दि.19 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी बॉक्स’ हे ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे. आता या पोर्टलवर सर्व खाजगी आस्थापनांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लैंगिक छळ अधिनियम 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करणे आवश्यक आहे. अंतर्गत तक्रार समिती स्थापन न केल्यास 50 हजार रुपये दंड करण्याची तरतूद सदर कायद्यात आहे.

          यासाठी जिल्ह्यातील खाजगी शाळा, महाविद्यालय, रुग्णालये,नर्सिंग होम, मॉल्स, मनोरंजन गृहे, निमशासकीय आस्थापनांनी या निर्देशांचे पालन करून आपल्या संस्थेची/आस्थापनांनी शी-बॉक्स पोर्टलवर त्वरित नोंदणी shebox.wcd.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन Private Head Office Registration या Tab वर जाऊन Proceed करून अचूक माहितीसह online माहिती भरून नोंदणी करावी व नंतर नोडल अधिकारी यांचेकडून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधितांच्या ई-मेल पत्त्यावर संदेश आल्यावर माहिती अद्ययावत करून घेणे बंधनकारक आहे.

         शी-बॉक्स पोर्टलमुळे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदविणे आणि त्याचा पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. तसेच प्रशासनाला या तक्रारींवर वेळेत आणि प्रभावी कार्यवाही करणे शक्य होईल.

         तसेच ज्या शासकीय आस्थापनेवर 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत अशा सर्व शासकीय आस्थापनांनी या निर्देशांचे पालन करून आपल्या आस्थापनांची ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर त्वरित आनलाईन नोंदणी करण्यासाठी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केलेबाबत अहवालासह username व paassword प्राप्त करणेसाठी त्वरित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, तिसरा मजला, खोली क्रमांक 36, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे त्वरित संपर्क करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा मोरे यांनी केले आहे.

blank