तिरोडा : श्री विठ्ठल- रुक्मिणी देवस्थान बेलाटी बुज (छोटा पंढरपूर) येथे संत निवृत्तीनाथ महाराज आणि माधोराव ढोबळे महाराज यांच्या पुण्य स्मृती निमित्त सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ८ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत साजरा करण्यात आला. या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ८ ते ९ वाजता ज्ञानेश्वरी पारायण दुपारी ४ ते ५ वाजता रामायण आणि रात्री ९ वाजता कीर्तन कार्यक्रम आयोजित होते.
छोटा पंढरपूर म्हणून ओळख असलेले बेलाटी खु. येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात प्रत्येक दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये १४ जानेवारी ला सायंकाळी बाहेरगावरून मोठ्या संख्येने भक्त व पालखीचे आगमन झाल्यानंतर हरिपाठ आणि रात्रीला जागृतीचे कीर्तन करण्यात आले. सकाळी पहाटे काकड आरती नंतर सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत प्रभात फेरी, ११ ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण, दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत गोपाल काल्याचे किर्तन झाल्यानंतर दहीहंडीचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, कवलेवाडा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी, पंचायत समिती सदस्य जितेंद्र चौधरी, बेलाटीचे सरपंच स्वाती चौधरी, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी अध्यक्ष मोरेश्वर आगासे व सर्व सदस्य बेलाटी बुज व समस्त ग्रामवासी तसेच भाविक भक्तगण उपस्थित होते.





