23.8 C
Gondiā
Tuesday, September 8, 2026
Home विदर्भ शेतकऱ्यांना तत्काळ धानाचे चुकारे अदा करा-अधिकार सामाजिक संघटनेची मागणी

शेतकऱ्यांना तत्काळ धानाचे चुकारे अदा करा-अधिकार सामाजिक संघटनेची मागणी

0
66

गोंदिया (ता.५) -मागच्या अनेक दिवसांपासून जिल्यातील खरिप धान पिकाचे चुकारे शासनाकडे अडले आहेत त्यातच शासनाने जाहीर केलेले धान बोनस अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याने शासनाने तत्काळ धान चुकारे व बोनस अदा करण्यात यावा अशी मागणी अधिकार सामाजिक संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने धान पीक पिकवून ते शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री केली.धान विक्री करून दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी अजूनही शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे अदा केले नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने बोनस जाहीर केले होते. ते बोनस सुद्धा शेतकऱ्यांचा पदरात पडले नाही. आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे अश्यात शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मुठीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ धानाचे चुकारे व बोनस अदा करण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्याचे मुखमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनीष मेश्राम, संयोजक आशिष नागपुरे, श्याम गणवीर, विजय बोरकर, दिलीप लिल्हारे, जितेन्द्र रेहेकवार, मुन्नालाल मेश्राम, गंगाप्रसाद मस्करे, विक्रम मानेकर, योगेंद्र पटले, ॲड.किशोर गडपायले, शैलेश वासनिक, शिवलाल नेवारे, देवेंद्र रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.