28 C
Gondiā
Tuesday, September 8, 2026
Home विदर्भ एम.बी.पटेल कॉलेज मार्गावर स्पीड ब्रेकर बसवा,एसडीओना निवेदन

एम.बी.पटेल कॉलेज मार्गावर स्पीड ब्रेकर बसवा,एसडीओना निवेदन

0
31
साकोली,दि.०५ : शहरातील एम. बी. पटेल कॉलेज रोड ते शासकीय मुलींच्या वसतिगृहापर्यंतचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून येथे शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापना तसेच मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती आहे. या मार्गावर काही वाहनचालकांकडून अतिवेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी गटनेता तथा नगरसेवक इंजी. संदीप वासुदेव बावनकुळे यांनी उपविभागीय अधिकारी अश्विनी कडूम यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली.यावेळी होमराज कापगते व एच. बी.उपस्थित होते. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.