25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ शेतात चिखलनी करताना ट्रॅक्टर उलटला : चालक ठार

शेतात चिखलनी करताना ट्रॅक्टर उलटला : चालक ठार

0
251

गोंदिया -शेतात चिखलनी करत असताना ट्रॅक्टर उलटून त्या खाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ताडगाव येथील शेतशिवारात घडली.प्रवीण किसन ब्राह्मणकर (४५) रा. पिंपळगाव/खांबी असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
ताडगाव येथील ताराचंद मोतीराम नाकाडे यांच्या शेतात चिखलनी करण्यासाठी गावातीलच नेताजी देवराम लांजेवार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ३५ एजी ८२४४) भाड्यावर घेण्यात आला होता. दरम्यान, चिखलनीचे काम सुरू असतान ट्रॅक्टरची चाके चिखलात फसली त्यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर चिखलात उलटला. ज्यामध्ये ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. मृत प्रवीण याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून घरात तो एकमेव कमावता व्यक्ती होता. त्यातच त्याच्या अशा अपघाती मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठविले. दुपारी ४ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पुण्यप्रेडीवार करीत आहेत.

blank