23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ रुग्ण कल्याण समितीत माजी आ. पटले व केलनका

रुग्ण कल्याण समितीत माजी आ. पटले व केलनका

0
25
गोंदिया,दि.22 :  जिल्हा स्तरीय रुग्ण कल्याण समितीच्या अशासकीय सदस्यांची निवड नुकतीच करण्यात आली. अशासकीय सदस्यांच्या रुपात जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भाजपा गोंदिया शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या नावाची निवड करुन जिल्हा प्रशासनाला दिली.त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना रुग्ण कल्याण समितीचे अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित केले आहे. माजी आ. पटले व केलनका यांच्या निवडी बद्दल जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.