25.4 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य

महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य

0
55

गोरेगाव:-स्थानिक पी डी राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समाजामध्ये महिलांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी पथनाट्य सादर केले. हे पथनाट्य गोरेगाव शहरातील भंगाराम चौक, ठाणा चौक, बस स्टॉप या प्रमुख चौकात सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी महिलांचे हक्क, शिक्षणाचे महत्त्व, स्त्रीभ्रूणहत्या, तसेच महिलांवरील अत्याचार यांसारख्या सामाजिक समस्यांवर प्रभावी अभिनय करून लोकांचे लक्ष वेधले. पथनाट्याद्वारे महिलांचा सन्मान राखणे आणि त्यांना समान संधी देणे हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजामध्ये महिलांविषयी सकारात्मक विचार निर्माण व्हावेत, हा या पथनाट्याचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सी डी मोरघडे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले, पर्यवेक्षक श्री ए एच कटरे सर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा डी एम राठोड, प्रा सी आर बिसेन, प्रा डी बी चाटे, प्रा ए जे सोरले, प्रा जे वाय बिसेन, प्रा के आय कटरे,कु एस आर मांढरे,श्री एस आर रहांगडाले, श्री आय बी पटले, श्री आर वाय कटरे,श्री झेड जे भोयर, अभय रहांगडाले तसेच माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले…..!!!

blank