२० ते २२ मार्चदरम्यान रंगणार थरार
गोंदिया,दि.१९ : तालुक्यातील दांडेगाव येथे पारंपरिक क्रीडा संस्कृती जपणारी ‘विदर्भ हिंदकेसरी’ भव्य बैलगाडा शर्यत (शंकरपट -२०२६) चे आयोजन २० ते २२ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दांडेगाव, सहेसपूर व एकोडी परिसरातील गंगा ठाकूर तलाव परिसरात पार पडणार आहे. आयोजकांकडून स्पर्धेची जय्यत तयारी केली जात असून बैल जोडीसह स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
दांडेगाव, सहेसपूर, एकोडी व परिसराच्या वतीने भैव्य विदर्भ हिंद केसरी बैलगाडा शर्य (इनामी शंकरपट) आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते आ.विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. यावेळी दिप प्रज्वलक म्हणून गोंदिया पं.स.सभापती मुनेश्वर रहांगडाले, तिरोडा पं.स.सभापती तेजराम चव्हाण, अजाबराव रिनाईम, सौ.वंदना पटले, शंकर टेंभरे, सौ.ज्योती शरणागत, सौ.विद्यकला कटरे, डॉ.चेतलाल भगत तर दान पुजक म्हणून जि.प.सदस्य अश्विनीताई पटले, जि.प.सदस्य पवन पटले, जि.प.सदस्य जगदिश बावणथडे, जि.प.सदस्य अंजलीताई अटरे, जि.प.सदस्य किरणकुमार पारधी, माजी जिल्हाध्यक्ष ओम कटरे, गंगाझरीचे ठाणेदार सुधिर वर्मा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत सहभाग घेणार्यासाठी आयोजकांनी स्पर्धेसाठी तब्बल १० लाख रुपयांपर्यंतची जंगी बक्षिसे जाहीर केली असून त्यामुळे शर्यतीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास स्प्लेंडर मोटारसायकल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. याशिवाय द्वितीय बक्षीस ७० हजार रुपये, तृतीय बक्षीस ५० हजार रुपये, चतुर्थ बक्षीस ४० हजार रुपये, पाचवे बक्षीस ३० हजार रुपये अशी रोख बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. तसेच सहाव्या ते पन्नासाव्या क्रमांकापर्यंत विविध रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी पहिल्या दिवशी प्रवेश फी १५०० रुपये, दुसर्या दिवशी २००० रुपये ठेवण्यात आली असून अंतिम फेरी १२ जोड्यांमधून पार पडणार आहे. त्याचप्रमाणे ५१ ते १०० पर्यंतचे बक्षिसही ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेचे बक्षिस वितरण २२ मार्च रोजी आयोजित आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन राहणार आहेत. यावेळी अतिथी म्हणून माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बन्सोड, बक्षिस वितरक म्हणून प्रापर्टी डिलर चंद्रकांत अंबुले, न.प.अध्यक्ष अशोक असाटी, गोंदिया न.प.अध्यक्ष सचिन शेंडे, न.प.उपाध्यक्ष संतोष पटले, जिल्हा बँकेचे संचालक हुकुमचंद ठाकरे, माजी सभापती संजय हेमने, योगेश्वर कुळे, संजय दुधाये, राजीव ठक्कर, विरंजन भांडारकर, जवाहर अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष पुढाकार घेतला आहे. आयोजकांनी परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे.





