24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ डॉ आंबेडकर सार्व.जयंती कडून थंड पेय वितरण* ईद उल फितर उत्साहात

डॉ आंबेडकर सार्व.जयंती कडून थंड पेय वितरण* ईद उल फितर उत्साहात

0
64

गोंदिया ता. 21:- डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्या वतीने थंड पेय वितरण करण्यात येऊन मुस्लिम बांधवाना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे यांनी मुस्लिम बांधवाना शरबत वितरण करुण केलं.
या प्रसंगी बोलताना श्री भावे म्हणाले की, ईद सारख्या पवित्र जश्नच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांची गळा भेट घेण्यात खूप आनंद मिळतो.भारतीय संविधान हा समता, स्वातंत्र्य, भ्रातुर्भाव आणि न्याय या तत्वाचे समर्थन करतं. त्यामुळे असे कार्यक्रम नेहमीच व्हायला पाहिजेत.परिणामी भारतात समता प्रस्थापित करण्यास मदत मिळेल आणि, संविधान प्रणित भारत निर्माण होईल. असे ते म्हणाले.यावेळी जयंती समितीचे कार्यकर्ते
अंकुर गजभिये, विलास वासनिक, पंकज वासनिक, इंजिनिअर छोटू बोरकर, संजय वाहने, मच्छिंद्र भेलावे, डॉ. राजेश उके, नूरलाल ऊके, सुशील गणवीर, संतोष शामकुमार, सुनील डोंगरे,अनंत टेंभुरकर,अशोक कांबळे, एन. एल. मेश्राम. एड. एकता गणवीर, सुनील मेश्राम, ऍड अंजली (चव्हाण ), धनंजय मेश्राम, नरेंद्र मेश्राम स्टडी पॉईंट,प्रा. सुरेश नंदेश्वर, नरेश उके,सुनील मेश्राम,जी.एल. तिरपुडे, पृथ्वीराज कोल्हटकर यांनी सहकार्य केलं.