नांदेड (वैशाली वाघमारे)– वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक आप्पाराव पेठ अंतर्गत गोंडजेवली तांडा व कंचली येथे जागतिक चिमणी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले.
आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे, मोबाईल टॉवरमधून होणारे रेडिएशन, वाढते प्रदूषण तसेच कीटकनाशकांचा अतिरेक यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एकेकाळी घरांच्या अंगणात सहज दिसणारी चिमणी आता दुर्मिळ होत चालली आहे. त्यामुळे या छोट्या पक्ष्याचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे.
यावेळी वनरक्षक रघुनाथ वनवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “चिमण्यांना वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणात किंवा गच्चीत पाण्याची व अन्नाची सोय करावी. तसेच कृत्रिम घरटी लावून त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे
उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे आवाहन केले.
या उपक्रमात जाधव बालाजी,सारगुडे एस. बी., सपकाळ सर, डोंगरे मॅडम, चिंतले मामा, कडमपल्ले दाउदास यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांनी मिळून चिमण्यांसाठी पाण्याची भांडी ठेवणे, घरटी बसवणे आणि जनजागृती संदेश देणे अशा विविध कृती केल्या.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिमण्यांबद्दल जागरूकता वाढली असून, “चिवचिवाट पुन्हा अंगणात ऐकू यावा” यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी सखाराम जाधव, सावित्राबाई राठोड, व्हीपिसिंग राठोड,प्रास्ताविक दिलीप वाघमारे यांनी केले तर आभार सारगुडे एस. बी.मानले.





