गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील (एनएनटीआर) ‘पांगडी’ नावाचा प्रबळ नर वाघ आणि एक वाघीण गेल्या असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ माजली होती.मात्र नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ‘पांगडी’ नर वाघ शासकीय अभिलेखानुसार NNTR T ३३ असून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील (एनएनटीआर) राखीव क्षेत्र AITE 2026 मध्ये नोंद झाल्याचे विभागाने स्पष्ट करीत वाघ बेपत्ता असल्याच्या वृत्तास नाकारले आहे..मात्र NT ३ वाघिणीबाबत मात्र नोंद झाली नसल्याचे म्हटले आहे.वाघ आपल्या क्षेत्रात बदल करीत असल्याने बेपत्ता झाले असे म्हणने योग्य नसल्याचे नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.सोबतच बफर क्षेत्रात वाघांच्या संनियत्रांची प्रकिया सुरु करण्यात आल्याचे म्हटले आहे.
नवीन प्रौढ नराची नोंद
सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांच्यानुसार, ‘पांगडी’ नावाने ओळखला जाणारा प्रमुख प्रौढ नर वाघ डिसेंबरपासून दिसलेला नाही. मात्र त्याच्या अधिवासात जांभडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका नवीन प्रौढ नराची नोंद झाल्याचे म्हटले आहे.वाघांची संख्या आणि अनुवांशिक विविधता मजबूत करण्यासाठी एनएनटीआरमध्ये पुन्हा आणलेल्या एनटी-३ या वाघिणीबद्दलही बाहेकर यांनी चिंता व्यक्त केली. “गेल्या सहा महिन्यांपासून ही वाघीण दिसलेली नाही, त्यामुळे अनिश्चितता वाढली आहे,” असे ते म्हणाले.“जर ‘प्रबळ वाघ’ म्हणून ओळखला जाणारा “पांगडी नर त्याच्या अधिवासातून बेपत्ता झाला, तर या वाघिणींना आणि त्यांच्या बछड्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो,” असे बाहेकर यांचे म्हणने आहे.





