30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व सदैव टिकवून ठेवा

सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व सदैव टिकवून ठेवा

0
93

सालेकसा,दि.१४ः साखरीटोला युवा कुणबी समाज सेवा समितीचा २३ वर्षांचा यशस्वी वारसा असून, यांच्या वतीने मागील २३ वर्षांपासून सुरू असलेली सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैसा आणि वेळ या दोन्हींचा अपव्यय टाळता येतो. त्यामुळे ही परंपरा आणि तिचे महत्त्व टिकून राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. डॉ. परिणय फुके यांनी केले.
१२ एप्रिल रोजी सालेकसा तालुक्यातील कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सामूहिक विवाह सोहळ्यात ८ जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आ. संजय पुराम, माजी आ. भेरसिंग नागपुरे,जिल्हा बँकेचे संचालक प्रफुल अग्रवाल, सालेकसाचे न. प. अध्यक्ष विजय फुंडे, उपाध्यक्ष कुंदन बहेकार,जि. प. सदस्य उषा मेंढे, वंदना काळे, लक्ष्मी तरोने, माजी सभापती लता दोनोंडे, पं. स. सदस्य रेखा फुंडे, सुनील तरोने, लीलाधर पाथोडे, समितीचे संस्थापक पदाधिकारी प्रभाकर दोनोंडे,कमलबापू बहेकार, रमेश चुटे, युगराम कोरे यांच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडला. आ. डॉ. परिणय फुके यांनी नववधूंना शुभेच्छा देत समाज भवनासाठी २० लाख रुपये जाहीर केले. तसेच खा. डॉ. नामदेव किरसान यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, सामूहिक विवाहाचे महत्त्व अधोरेखित केले आणि समाज भवनासाठी १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी माजी खा. सुनील मेंढे, माजी आ. सहर्षराम कोरोटे, माजी जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर, डॉ. नोव्हिल ब्राह्मणकर आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित होते.मेळाव्यासाठी अध्यक्ष संतोष बोहरे, पृथ्वीराज शिवणकर, देवराम चुटे, अरविंद फुंडे, रामदास हत्तीमारे, प्रमोद कोरे, नरेश कावरे, चंद्रकुमार बहेकार, योगेश बहेकार, प्रेम कोरे, जी. डी. भांडारकर, देवराज खोटेले, श्यामलाल दोनोडे, अनिल काळे, प्रेमलाल ठाकरे, मोहन दोनोंडे, नितीन शिवणकर व समाजबांधवांनी सहकार्य केले.