26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ खोटी अ‍ॅट्रासिटी तक्रार रद्द करा,ओबीसी संघर्ष कृती समितीची मागणी

खोटी अ‍ॅट्रासिटी तक्रार रद्द करा,ओबीसी संघर्ष कृती समितीची मागणी

0
29
गोंदिया : येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेली अ‍ॅट्रासिटीची तक्रार खोटी असून ती रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकाºयांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नियमीत शाळा तपासणीसाठी गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये एका शिक्षकासह दीड महिन्यापूर्वी नूतन विद्यालय गोंदिया येथे गेले होते. याच शाळेतील शिक्षक मेश्राम यांनी खोटी तक्रार दाखल करून इतर दोन ओबीसी शिक्षकांनी साक्ष देवून हेतूपूरस्पर डोये यांना फसविले. या प्रकरणाची सहनिशा करून खोटी तक्रार करणाºया तथा खोटी साक्ष देणाºयांविरूद्ध कारवाई व्हावी व यापुढे अशा प्रकरणी सखोल चौकशी करूनच गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वºहाडे, कैलाश भेलावे, शिशिर कटरे, एल.यु.खोब्रागडे, एस.यु.वंजारी, प्रेमलाल साठवने, बंशीधर शहारे, खुशाल कटरे, पेमेंद्र चव्हाण, गणपती उरकुडे, मोरेश्वर बडवाईक, रामकृष्ण गौतम आदिंसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.