लाच स्विकारतांना पोलीस शिपायासह होमगार्डला अटक

0
11

गोंदिया-आमगाव पोलीस ठाण्यातील नायक पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या ईसन जानुजी कवास व होमगार्ड नितेश लोकचंद खांडेकर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १००० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई काळी पिवळीचालक वाहनचालकाच्या तक्रारीवरुन सापळा रचून करण्यात आली.आमगाव -देवरी राज्यमार्गावर काळीपिवळी नियमित चालविण्यासोबतच कारवाईपासून वाचविण्यासाठी मासिक एंन्ट्रीच्या नावावर एक हजार रुपयाची मागणी फिर्यादीकडे केली होती.परंतु फिर्यादीची इच्छा नसल्याने ५ नोव्हेंबर रोजी त्यांनी तक्रार नोंदविली.तक्रारीवरुन ८ नोव्हेंबरला सापळा रचून १००० रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.पोलिस शिपाई कवास व होमगार्ड खांडेकर यांच्याविरुध्द आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.