आमगाव :-आमगाव येथील दमाहे परिवार आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आपल्या चार चाकी वाहनाने बालाघाट जवळ असलेल्या कान्हा नॅशनल पार्कला जात असताना आज दुपारी ११. ३० वाजता दरम्यान बालाघाट बैहर मार्गावरील लोगूर घाटीत एका बसने त्यांच्या चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने एकाच्या मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आमगाव शहरातील पेंट्स दुकान चे संचालक निमेश दमाहे आपल्या पत्नी व दोन मुलासह आज सकाळी साडेदहा वाजता जवळ असलेल्या कान्हा अभयारण्याला भेट देण्यासाठी निघाले. प्रवास सुरू असताना बालाघाट बैहर मार्गावर असलेल्या लौगर घाटावर विरुद्ध दिशेने येत असलेल्या प्रवासी बसने त्यांच्या चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत निमेश दमहे यांच्या पत्नी दुर्गा दमाहे वय ३३ वर्ष यांचा अपघाती निधन झाला. तर निमेश दमाहे व दोन मुले जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्गा दमाहे ह्या लोधी समाज सेवा समितीच्या संचालिका होत्या. बातमी कळताच कुटुंबावर शोककळा पसरली. भीषण दुर्घटना झाली हे करतात आमगाव शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
निमेश दमाहे हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी असून त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव तालुका अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते भारतीय जनता पक्षाच्या आमगाव शहर सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद प्रसंगामुळे भाजप परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.





