तीन महिन्यात ५६ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

0
11

भंडारा दि. १४ –: गोंदिया,भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक मोहिम सुरु झाली असून सप्टेंबर ते नोव्हेंबर या तिन महिन्यात तब्बल ५६ लाचखोर एसबीच्या जाळयात अडकल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

भ्रष्टाचार हा कधीही बरा न होणारा रोग आहे असे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु म्हणून गेले. आज त्याचे प्रत्यंतर ६७ वर्षानंतरही दिसत आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागही या लढाईत योगदान आहे. नागरिकांचे सहकार्य आणि एसबी विभागाचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे महाराष्ट्रभर लाचखोरांवरील कारवाईत वाढ झाली आहे. हे राज्यातील लाचखोरांच्या फुगलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ११, आॅक्टोबर ५४ आणि ८ नोव्हेंबरपर्यंत १ अशी १५ लाचखोरांची संख्या आहे. जानेवारी २०१६ व आॅगस्ट २०१६ पर्यंत दोन्ही जिल्ह्यांचे पथक मिळून १८ प्रकरणात ३८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली होती तर ३ संयुक्त कारवाईत ३ लाचखोर आरोपींचा समावेश होता. म्हणजे एवूष्ठण ३१ प्रकरणात ४१ लाचखोर गजाआड झाले आहेत.

गतवर्षी या लाचखोरांच्या आकडेवारीचे सिंहावलोकन केले तर लाचखोरांमध्ये महसूल विभाग प्रथम तर पोलीस विभाग क्रमांक २ वर होता आणि त्यापाठोपाठ इतर विभागांचा समावेश होता. मात्र २०१६ या वर्षात अनेक विभागाचे आकडे बदलतांना बघितले जाते. ज्या विभागातून देशात आधारस्तंभ घडविला आहे त्या शिक्षण क्षेत्राने जिल्ह्यात लाचखोरीत अग्रक्रमांक प्राप्त केला. जानेवारी ते ८ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण विभागातील तब्ल १३ लाचखोर कमर्चारी एसबीच्या जाळयात अडकले. यात शिक्षणाधिकारी १, शिक्षक ३ व इतर शाळा संबंधित ३ जणांचा समावेश आहे.

१ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भंडारा एसबी पथकाने ४ प्रकरणात सहा लाचखोरांना गजाआड केले. गोंदिया पथकाने याच दरम्यान याच प्रकरणात ४ लाचखोरांना अटक केली. याचदरम्यान तिन संयुक्त कारवाईत ५ लाचखोर गवसले. या संयुक्त कारवाईत भंडारा – नागपूर, गोंदिया -चंद्रपूर आणि भंडारा – गडचिरोली या संयुक्तीक पथकांचा समावेश आहे. एकूणच भंडारा – गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जिल्हानिहाय आकडेवारी समोर आणली तर ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत एवूष्ठण १८ प्रकरणात २८ लाचखोर भंडारा पथकाला गवसले. गोंदिया पथकाला १८ प्रकरणात १० लाचखोर तर संयुक्त कारवाईत ६ प्रकरणात ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १८ प्रकरणात १० लाचखोर गवसले तर संयुक्त कारवाईत सहा प्रकरणात आठ लाचखोरांना अटक करण्यात आली.