भारत विविधतेत एकतेचे माहेरघर

0
11

गोरेगाव : जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनातर्फे सरदार पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून जगतराम रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात सरदार पटेल व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे, प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम, सांस्कृतिक प्रमुख डॉ.आर.एन.साखरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.जे.बी.बघेले उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांनी सरदार पटेल यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा.जय कटरे यांनी केले. तर आभार डॉ.आर.एन.साखरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.